हिंदोळे मनाचे….

“वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.”

खूप दिवसांपासून काहीतरी लिहितं होण्याची अनिवार उर्मी दाटून येत होती. डोक्यातलं विचारांचं थैमान थामेनसा झाला की अपोआप कागद पुढ्यात ओढला जातो अन ते वादळ कागदावर स्थिरावते. स्थिरावते असं म्हणायचं कारण या वादळाचा वेग एवढा प्रचंड की याला गोठवणे मुश्कीलच. तरीही त्यांचा जीवघेणा नकार, मोठ्या निकराने परतवत धरू पाहते त्यांना माझ्या ओंजळीत. कधी चुचकारत तर कधी आर्जवं करत घालत राहते साद. त्यांचीही तऱ्हा निराळीच.

फुलापाखारांप्रमाणे जो जो यांना धरण्यासाठी जावे तो ते चाकवत राहतात, भुलवत राहतात. कधी चिडून थकून शरणागत व्हावं तो आपसूक हात-खांद्यावर बागडत राहतात. माणसांचही असंच असतं ना? वरच्या दिखाव्याला, रंगरूपाला भुलून आपण शर्थीनं पकडू पाहतो त्यांना आपल्या मुठीत घट्ट, अगदी घट्ट
आणि ती मात्र धावत राहतात आणि कुठल्यातरी चकव्यामागे. हे चक्रही निरंतर जणू. अवर्तानावर आवर्तनं पडत राहतात, आणि बघता बघता हा पाठ – शिवणीचा खेळ अवघं आयुष्य व्यापून टाकतो. हा खेळ आहेच तसा लोभवणारा, रिझवणारा. शब्दांनी मला चकवावे आणि मी त्यांना शोधावं त्यांचं अस्तित्व माझ्यात, माझ्या जगण्यात. मी मांडतेय हा खेळ, तुमच्या साथीनं. तुमची साथ गृहीतच धरलीये मी प्रतिक्रियांच्या रूपाने. बनाल नं माझे सवंगडी?

Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

One Response to हिंदोळे मनाचे….

  1. Aparna म्हणतो आहे:

    छान मांडलाय पाठशिवणीचा खेळ..
    माझ्या दोन पोस्ट्स आहेत एक हिंदोळे मनाचे आणि दुसरी हिंदोळेच मनाचे…त्यातल्या नामसाधर्म्यामुळे खास ही पोस्ट वाचली…आणि मनाचा एक वेगळा खेळ वाचायला मिळाला..
    पुलेशु…:)

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s