आई म्हणून घडताना…….

दिवस नेहेमी प्रमाणेच घड्याळाच्या काट्यावर सुरु झालेला.०७:३० वाजता येणारी कंपनी बस चुकवायची नाही हे एकच टार्गेट समोर ठेवून हात भराभर कामं आणि वेळ यांची सांगड घालत होते. बेडरूम मध्ये माझं ३ वर्षांचं पिल्लू निवांतपणे स्वप्नातल्या परिशी हितगुज करत झोपेची सवारी करत होतं. सध्या प्ले ग्रूप ला सुट्ट्या असल्यामुळं पिल्लाची निदान काही काळासाठी तरी घड्याळाशी कट्टी आहे. नाहीतर मी, पिल्लू आणि घड्याळ यांचं त्रैराशिक मांडता मांडता ~~~~~~@@@@~~~~……… असो सुज्ञास सांगणे न लगे.

असो, भरकटलेलं गाडं रुळावर आणावंच आता. तर कामं आवरता आवरता मनात एकीकडे लाउड थिंकिंगचालूच होतं. आता पिल्लू उठलं तर? मम्माची चाललेली लगबग बघून आज काय डरकाळी फुटणारे आहे देव जाणे. येता जाता बाईसाहेबांच्या हालचालींचा अंदाज घेणे चालूच होते. आणि नाही… अजून काही चिन्ह नाहीत उठण्याची म्हणून स्वतःशीच समाधानी होत होते.

‘चला, ०७:३० झालेत, आता पटकन अंघोळ करून बाहेर पडावं’ या हिशेबाने गिझर चालू केला आणि तेवढ्यात.

” मम्मा, तू आजपण ऑफिशला जाणाल आहेश का? खणखणीत सवाल माझ्यावर आदळला. (हाय रे देवा, हिच्या डोक्यात काय माझ्या मनाचा स्कॅनर फिट केलाय का?)
“आता काय? नवऱ्याशी आंखो ही आंखो में….”
” तू पळ अंघोळीला. मी बघतो तिला.” इति नवरोबा.
ठीके म्हणून आम्ही प्रस्थान केलं खरं पण मनात आपलं ते चालूच होतं… लाउड थिंकिंग… पल्याड काय चालू असेल याचं.

“गुड मॉर्निंग शोना. उठलं का माझं पिल्लू? चला खाली या. बोर्नविटा कोण फिनिश करणार आहे पहिला? चला चला… – बाबा”
“बाबा तू जा.. मी कट्टी तुज्याशी मिम्मी कुथय?”
अरे, मम्मा शंभो करते आहे. आता येईलच हं. तू ये ना खाली… नवरोबा.
उंहू….. ??? कन्यारत्न तोंड फिरवून पलीकडे.

बाथरूम वर टकटक. “वातावरण तापलंय बरं का…..” मिम्मिला रिपोर्टिंग. मिम्मीचा अर्धा जीव गार. “आलेच हं”.
“शोना, आज बाबा किनई तुला मोठ्ठं चॉकलेट आणणार आहे”. खिंड लढवण्याचा बाबाचा निकराचा प्रयत्न चालू.
“मला नको”. – माघार नाहीच.
“मग मोठ्ठी डॉल?” – (आमिषं वाढतायंत का?)
उंहू ….. ??? बाबाची शस्त्र म्यान?
आता मैदानात येण्यावाचून पर्यायच नाही हे जाणून मी तिच्याजवळ गेले.

“मिम्मी, तू आजपण आफिशला जाणाल आहेश का?” “हो रे मन्या, मम्माला जायला हवंय रे.”
(सुट्ट्या लागल्यापासून रोज आम्हाला या प्रश्नाला तोंडी लावावं लागतंय बरं का…)

“सॉरी पिल्ला, पण मम्मा उद्या नक्की सुट्टी घेणार आहे. हो ना रे बाबा?” – बाबाचा मोठ्ठा होकार.
“तू खोतं बोलतेश” …………………..@@@………………….
“नाही गं मनु, मम्मा खरंच सुट्टी घेणार आहे उद्या. आणि आज आज्जी तुला नं बागेत नेणार आहे. बागेत मज्जा करणार आहात नं तुम्ही शगले?” आर्वी, तन्मय, मृण्मयी सगळे येणार आहेत.” हो नं आजी? हो… आणि आम्ही किनई तिकडे आईसक्रीम पण खाणार आहोत. बाबा आणि मम्माला नाहीच. आज्जीही मदतीला धावली.

“कट्टी” चिमुकली करंगळी वर झाली. वाटाघाटीच्या सगळ्याच शक्यता मोडीत.
“असं नाही करायचा मनु. तू गुडगर्ल आहेस नं? मम्माशी कट्टी करतात का अशं? मम्माला उशीर होतोय बेटा. मम्माची बस येईल आता. तू येणार नं बाय करायला? चल बघू. पटकन.”

नाही, आज बहुतेक असहकार अगदी ठाम होता. डायरेक्ट ब्रम्हास्त्रच बाहेर निघालं होतं. एव्हाना पिल्लाच्या डोळ्यांत पूर दाटलेला. नजरेत फसवलं गेल्याचं दुःख स्पष्ट दिसून येतंय. मम्मा खोटं बोलतेय याचा न पेलवणारा ताण काही सांगू पाहतोय. पण…..

डोळ्यांआड दाटणाऱ्या पाण्याला निकराने थोपवत मी पिल्लाला समजावू पाहते. मनात स्वतःच्या हतबलतेची पुरेपूर जाणीव असलेली मी शिकवू जाते तिला compramise चा अनिवार्य धडा. व्यवहारी जगण्यातल्या असहाय्य क्षणांना टाळू म्हटलं तरी टाळता नं येणारे आपण, काय समजावू शकणार होते मी माझ्या पिल्लाला? कि बाळा, या productive जगात तुझ्या माझ्या मध्ये असणारे हे निरागस क्षण, जास्त वेळ कुरवाळत बसण्याचं स्वातंत्र्य मला नाही गं. स्वतः भोवती आखलेल्या चौकटीत स्वतःच इतके गुंतून गेलेलो असतो गं आम्ही मोठी मानसं कि या निरागस क्षणांची हाक ऐकूनही नं ऐकल्यासारखं करण्याचा बेडरपणाही सहजच घडून जातो गं….
अगदी नकळत.

थोडं समजावून, थोडं थोपटून, मी घराबाहेर पडले खरी. बाबाच्या कडेवर बसून पिल्लूही आलंच मला बाय करायला. पण चेहऱ्यावर मनातलं सगळं स्पष्ट चितारलेलं होतं. मम्माच्या वागण्याचं कोडं आणि असं का? चं भलं मोठं प्रश्नचिन्ह. तिला बाय करताना मला स्वच्छ जाणवतंय, ‘मम्मा नको ना जाऊ आफिशला’ चा हुंदका.

नवरा हात हलवून म्हणत होता, “don’t worry, she will be ok.”

‘होय रे, ती होणारच होती ओके. व्हायलाच हवं होतं तिला ओके. तसंही तिच्या या अगदी शुल्लक पण तरीही खूप खूप हव्याहव्याश्या मागणीला आपण कसं handle करणार आहोत आपण? तिच्या हट्टाकडे आपण किती entertain करू शकणार आहोत?

कदाचित ती हे सगळं विसरूनही जाईल. मी घरी पोहोचेतो सकाळी काय घडलं त्याचा मागमूसही नसणार आहे तिच्या चेहऱ्यावर. मी घरी गेल्यावर ती तशीच, ‘मम्मा’ म्हणून मला बिलगणार आहे, मम्माला एका दमात आज काय काय केलं हे सांगण्यासाठीची तिची घाई बघून मला नेहमी प्रमाणेच खुदकन हसू येणार आहे, अगदी नेहमी सारखंच. आत्ता या क्षणी तिची मम्मा तिच्याजवळ आहे एवढंच तिला माहित असणार. हे क्षण ती भरभरून जगू पाहणार आणि या निर्मळ आनंदात ती मलाही तितकंच चिंब भिजवणार, मला खात्री आहे. कारण अजून अकौंट कीपिंग चा विषय तिच्या जगात वर्ज्य आहे नं.

तळटीप: हा लेख माझा दुसरा ब्लॉग http://www.mazyatalime.bloggers.com येथे या पूर्वीही प्रसिद्ध झाला आहे.

 

Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

6 Responses to आई म्हणून घडताना…….

 1. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  😦
  account keeping nasna hech best asta…

  • shradha kulkarni म्हणतो आहे:

   लहान मुलांसारखाच प्रत्येकाला आपला निरागसपणा जपता आला असता तर किती छान झालं असतं नं……
   म्हणूनच ‘लहानपण देगा देवा……’ 🙂

 2. ashvini म्हणतो आहे:

  kharach ajachya ghai gadabadichya jamanyat aplya pillanacha lahanpan vsarat chalalo ahot. Jevha tyana apali garaj asate tevhach apan busy asato aani jeva apalyala vel asel tevha apala pillu busy asanar.
  dats life!!!

 3. vivek kulkarni म्हणतो आहे:

  Mast re pillya

 4. Dipti म्हणतो आहे:

  mast, vachtana malahi mazya mulibarobarche kshan aathvun dolyat pani aale, kharach aaplyasarkhi duti karavi lagte pillana.

 5. महेंद्र म्हणतो आहे:

  अगदी डॊळ्यासमोर प्रसंग उभा केलास.. छान लिहिलंय.. 🙂

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s