Monthly Archives: एफ वाय

उगाचच…..

  उदास  गमते  उगाच  काही वेढून राही उगी निराशा, श्वासांचाही उगी पसारा  वाढत जाई…….   कसले पाणी, कसल्या व्यथा, कुठले उसासे समजत नाही, उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न कुठले उमजत नाही…..   मीच होते घातले मजला, हे कोडे अशक्यतेचे, आता कुठले उःशाप मजला, हे तर अभंगतेचे लेणे   नकोस बोलू उगीच काही, शब्दांचे ही होत ओझे या वेडाला आता कुठले ठिकाण ही मज उमगत नाही….           Advertisements

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | 2 प्रतिक्रिया

असाही एक दिवस….. (रात्र? :))

असाही एक दिवस….. (रात्र? :)) परवा मी आणि नवरा काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो… पुण्यातल्या संध्याकाळच्या गर्दीत चारचाकी पेक्षा बाईक बरी म्हणून बाईकवर गेलेलो. परत येताना नाही म्हणायला बराच उशीर झालेला. काम संपवलं आणि आता गाडीला किक मारून स्टार्ट करून २ एक मिनिटं झाली असतील तोच गाडी गचके देऊन थांबती … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | 6 प्रतिक्रिया