Monthly Archives: एफ वाय

कविता

  शब्दांच्या पलीकडलं खूप काही….. काही तुझं काही माझं, काही आपल्या दोघांचं, काही बोललेलं, काही ओठांतच मिटलेलं आता तुझ्या हाती सोपवावं म्हणतेय   सांभाळशील?   त्या मोरपिसावरचा माझा अलवार स्पर्श, ती हातांची गुंफण अन नवथर श्वास…… धुंद पावसाळी श्वासात विरघळलेला मोगरीचा सुवास…… माझ्यातून मी पण सुटताना……   देशील  तोच हळुवारपणा?   दंव माखल्या पहाटे, घट्ट झालेली मिठी    श्वासातला तो हुंकार अन बेहोषनारं … Continue reading

Posted in कविता, सहज सुचलेलं | Tagged | 2 प्रतिक्रिया

भरकटलेलं – काहीबाही

  उन्मळून पडावं असं खूप काही आहे. झाकोळून जायला कारणही पुरेशी आहेत, पण न जाणे कुठला तरी चिवट तंतू सतत जाणीव करून देत असतो, नाही ‘तू’ मोडायचं नाहीस, वाकायचं नाहीस, रक्तातली धुगधुगी अजून विझली नाहीये अन आशेचे मनोरे एकेक इमले वर चढतच जातायत….. आशा….. अस्तनीतला निखारच जणू. अगम्यतेच्या वावटळीत भिरभिरताना कितीतरी … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

कविता

  माझ्या झिरझिरीत आयुष्याला वेढून राहिलेत तुझ्या अस्तित्वाचे काही क्षण माझ्या देह-मनावर पसरून राहिलेत तुझ्या स्पंदनांचे दाट ओघळ, मी लपेटून घेतलीये तुझी काजळमाया घट्ट अगदी घट्ट…. तुझ्या-माझ्यातले क्षण, आता बनू पाहतायत माझ्या सावलीच्या खुणा     श्रद्धा    

Posted in सहज सुचलेलं | Tagged | यावर आपले मत नोंदवा