Monthly Archives: एफ वाय

श्राव्यकथा…

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस… थोडा आरामासाठी पण खुपसा पुढच्या आठवड्याच्या बेगमीसाठी… 🙂 आठवड्याचा भाजी-पाला, थोडं इकडचं तिकडचं समान हा तर ठरलेला अजेंडा विकांताचा. मागच्या रविवारीही संध्याकाळी ४ नंतर हे काम करायचं ठरलं, नेहमी बाबा असतो आमच्यासोबत पण यावेळी बाबा कामानिमित्त मुंबईला होता… त्यामुळे ही खिंड एकटीलाच लढायची होती आमच्या छोट्या शिलेदारनीला सोबत घेऊन…. 🙂 म्हटलं चला.. आला प्रसंग साजरा करू या ….. कामही होईल आणि शिकवून ही होईल… 🙂 🙂 आमच्या चिंचवडचं मार्केट फार … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | 8 प्रतिक्रिया

कातरवेळ…..

      सांजवेळी क्षितीज लाल रंगात न्हात असताना किती शांत नि अबोल होत जातं. प्रकाशाचा राजा आपल्या कर्तव्यपूर्तीच्या अतीव समाधानात अस्ताला जात असतो. सांजसावल्यांचा फेर साऱ्या आसमंताला शाम रंगाने वेधून घेतात. निळाभोर आकाश सांजमेणा होऊन त्याला आपल्या कुशीत घेऊ बघतं. जणू दिवसभर नजरेआड राहिलेल्या बाळाला पदराआड घेऊन जोजवणारी, बाळाच्या दमलेल्या पण तरीही लोभसवाण्या चेहऱ्याकडे मायेने एकटक पाहत राहणारी आईच… पुन्हा एकदा … Continue reading

Posted in सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | Tagged | 5 प्रतिक्रिया