श्राव्यकथा…

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस… थोडा आरामासाठी पण खुपसा पुढच्या आठवड्याच्या बेगमीसाठी… 🙂 आठवड्याचा भाजी-पाला, थोडं इकडचं तिकडचं समान हा तर ठरलेला अजेंडा विकांताचा.
मागच्या रविवारीही संध्याकाळी ४ नंतर हे काम करायचं ठरलं, नेहमी बाबा असतो आमच्यासोबत पण यावेळी बाबा कामानिमित्त मुंबईला होता… त्यामुळे ही खिंड एकटीलाच लढायची होती आमच्या छोट्या शिलेदारनीला सोबत घेऊन…. 🙂 म्हटलं चला.. आला प्रसंग साजरा करू या ….. कामही होईल आणि शिकवून ही होईल… 🙂 🙂
आमच्या चिंचवडचं मार्केट फार लांब नाही… परिसरही फार गर्दीचा नाही आणि आरामात खरेदी करता येण्यासारखा आहे त्यामुळे नेहमीच्या पिंपरी मार्केटला फाटा देऊन यावेळी चिंचवडची निवड केली. मार्केटमधून फिरता फिरता लेकीला जे म्हणून आवडतं त्याची रवानगी पिशवीत होत होती… मम्मा कुकुंबर, मम्मा पतातो असे एक ना अनेक मंडळी वसतीला आली. सगळी भाजी घेतल्यावरच मग कोथिंबीर/लसून/आलं घ्यायचं हा शिरस्ता याही वेळी पाळला आणि शेवटची कोथिंबीर घ्यायला म्हणून एका भाजीवालीपाशी टेकले.
इतका वेळ माझ्यासोबत मस्त गप्पा, बडबड करणारं माझं पिल्लू मधेच गप्प झाल्यासारखं वाटलं. काहीतरी निरीक्षण चालू होतं बहुतेक. कोथिंबीर घेऊन ‘चल’ म्हणून तिच्याकडे वळले तर काय? ती तिथे होतीच कुठे? इकडे तिकडे बघते तर काय पिल्लू जवळपासही कुठे नव्हतं. थोडं इकडे तिकडे बघून, आवाज देऊन झालं पण तिचा काही पत्ताच नाही. आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मार्केटच्या बाहेर लगेच रहदारीचा रोड सुरु होत होता. न जाणो तिकडे गेली असेल तर…. असला विचार मनात येऊन माझ्या पायाखालची जमीनच खचल्यासारखं झालं. तशीच आजूबाजूच्या भाजीवाल्यांना विचारत सुटले पण कोणाच्याही लक्षात आलंच नव्हतं… वेड्यासारखी अवस्था झालेली…. एव्हाना बऱ्याच जणांना झाला प्रकार लक्षात आला. मंडईतली काम करणारी पोरं पण “ताई, थांबा आम्ही बघतो, जरा धीर धरा, असेल इथेच कुठे…” म्हणून लगेच चारी बाजूला धावली… मी मनातल्या मनात गणपतीला, देवीला साकडं घातलं, पिशवी तिथेच ठेवून पुन्हा मार्केटभर शोधायला निघाले… जणू माझ्या संवेदनाच नाहीश्या झाल्या होत्या… कोणीतरी डोक्यावर मणभर ओझे दिल्यासारखे पाय जडशीळ झाले  होते.. रस्त्यापर्यंत पोहोचले पण ती काही दिसली नाही…. रडूच यायला लागलं एकदम… मनात नाही नाही ते विचार यायला लागले….मुल पळवणं, अपघात, काय काय नं काय काय !!!  पिल्लाचा भांबावलेला चेहरा समोर दिसू लागला. स्वतःलाच दोष देत मी तिला रस्त्यावर वेड्यासारखी शोधत होते.
                   “तितक्यात कुठूनसा पिल्लाचा आवाज कानी पडला, “मम्मा”….
वळून बघते तर माझी शिलेदारीन माझ्याकडे झेपावत होती… क्षणभर कळेच नं की खरंच ती होती की भास होता, पुन्हा मोठमोठ्याने मम्मा, मम्मा, करत पिल्लू माझ्याकडे येत होतं. झटकन जाऊन तिला उचललं.. कितीतरी वेळ नुसतं तिला घट्ट पकडून उभी होते, कसलंच फिलिंग जाणवत नव्हतं… नं रडू येत होतं नं अजून काही, पिल्लालाही समजत नव्हतं की मम्माला नक्की काय झालंय… ती ही शांतपणे बिलगून राहिली…
थोड्यावेळाने सावरल्यावर मी जवळजवळ ओरडलेच, ” कुठे गेली होतीस गं हात सोडून, असं न सांगता जातात का कधी, हरवली असतीस कुठे मग? किती शोधलं तुला? पण अशी कशी गेलीस तू?” 
एक न अनेक प्रश्न… पिल्लू नुसतंच भांबावून बघत राहिलं.. मम्माचं बोलणं बाउन्सर होत होतं नं तिला…. तिला कळेच नं मम्माला नक्की काय झालेय… अशी काय वागतेय… तिच्यालेखी काही चुकीचं घडलंच नव्हतं नं….
“बोल, जाशील पुन्हा अशी नं सांगता?” माझा तोफखाना चालूच होता….  मुलांवर ओरडू नये आधी त्यांच्याकडून कारण ऐकावं, मग समजवावं असली शहाणपणाची मुळी फक्त सारं आलबेल असल्यावरच लागू होते पण आणीबाणीला??????? तारेच चमकतात…
“चल आता, पुन्हा हात सोडून गेलीस तर बघ…” पिल्लू बोट पकडून चालू लागलं… इतका वेळ लक्षात आलं नव्हतं पण पिल्लाच्या हातात काहीतरी होतं.
“मम्माSSSSS हे बघ मी तुला काय आणलं? बघितलं तर पिल्लाच्या हातात होतं…..
 
 Image
 
कण्हेरीची*** चार-दोन फुलं, तीही रस्त्यावर कुठेतरी पडलेल्या नट-बोल्ट मध्ये खोचलेली…. त्या फुलांचा मनमोहक रंग पाहूनच कदाचित पिल्लू त्याकडे वळलं असावं… त्याही  उपर ते मम्माला दिलं तर मम्माला ते आवडेल हा केवढा साधा विचार तिने केला होता….. बरं नुसती फुलंच नाही तर ती देण्यातही केवढी कल्पकता….
रस्त्यावरचं एक नट-बोल्ट सारख्या साध्याशा वस्तूला वापरून ते सुंदर बनवणं….. माझे डोळे नकळत भरून आले… तिच्याकडून ते गिफ्ट घेताना मला खूप खूप स्पेशल असल्यासारखं वाटलं.
पिल्लू म्हणे, “मम्मा मश्ताय नं?” हो रे पिल्ला, खूप मश्तंय…. आजवरचं  सगळ्यात खास गिफ्ट आहे माझं हे, तुझ्यासारखंच युनिक… अगदी वेगळं !!! 
अगदी थोड्यावेळा पूर्वीच तिला मी माझ्या अपेक्षांना अनुसरून न वागल्याबद्दल रागवत होते आणि आत्ता तिच्यातल्या निरागसतेनं मी भारावले होते…. माझं मलाच ठरवता येईना, माझी नक्की कुठली बाजू बरोबर होती… तिला रागावण्याची की तिचं कौतुक वाटण्याची…. काही असो चूक की बरोबर मला नाही ठरवता येत पण या क्षणी तरी मला खुप छान वाटतंय….:) 🙂
माझ्यासमोरचं माझं छोटं प्रतिबिंब, तिच्यात उमलणारी संवेदना….. बीज अंकुरतय तर… तिच्या व्यक्तिमत्वाची बांधणी सुरु झालीये तर…. बाकी कोणाचीही अजिबात मदत न घेता तिचं तिला काहीतरी ठरवता येतंय…. किती गोड संवेदना आहे ही…. या निरागसतेचं श्रेय मी अजिबात घेणार नाही…. ते आहेच तिच्या आत निरंतर… मी फक्त ते उमलण्यास हातभार लावू शकले, ते असंच जपू शकले तरी जितं मया…… !!! हो नं???? 🙂 🙂 🙂
 
 
*** कबुलीजवाब: फार फार वाइट आहे नं मी…. आत्ता एवढं कौतुकानी पोस्ट वगेरे लिहिली पण  तेव्हा त्या गिफ्टचा फोटो वगेरे काढायचं खरंच नाही सुचलं. 😦
समाधानासाठी गुगल्याचाच आधार घेतलाय… 
श्रद्धा
Advertisements
This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

8 Responses to श्राव्यकथा…

 1. Kedar patankar म्हणतो आहे:

  तुमचा अनुभव वाचला. प्रत्ययकारी लेखन. तुमच्या पिल्लाला शुभेच्छा.

 2. Prachi म्हणतो आहे:

  अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला… खूपच गोड आणि निरागस…. 🙂

 3. ashvini म्हणतो आहे:

  bharich ahe Shravee..but wat a creativity ha.kindly appreciate her……

 4. Ajinkya Phadnis म्हणतो आहे:

  Wonderful post….

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s