Monthly Archives: एफ वाय

नकुशा

ती…… जल्मच तिचा ‘नकुशीचा’….. आई-बापाला पहिल्या चारही मुलीच. बापाच्या जीवाला  कुलदिपकाचे डोहाळे लागलेले. पाचव्यांदा चाहूल लागली तेव्हा मायेचा जीव सततच्या  पोरवड्यानं आधीच कातावलेला. त्यात बापानं धमकी दिलेली……घराला दिवा आला तर ठीक नाही तर दुसरं खटलं जमवतो म्हणून. ‘मायेनं’ ते दिवस … Continue reading

Posted in सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | Tagged | 3 प्रतिक्रिया

शांताबाई….

आज 19 ऑक्टोबर, शांताबाईं चा जन्मदिवस. ज्यांचं साहित्यही व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच स्वच्छ, निर्मळ, नितळ, प्रसन्न, स्निग्ध, आनंददायी व शालीन आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक! खरंतर मी आज शांताबाईंबद्दल लिहितेय म्हणजे खरंतर सूर्य नि काजवा असंच काहीसा होईल पण फक्त त्यांच्या माझ्यातील ‘शब्दबंध’ या एका … Continue reading

गॅलरी | Tagged , | 4 प्रतिक्रिया

‘लांबणीवर टाकलेला आनंद’

खूप दिवसांपूर्वी पाडगावकरांची एक कविता वाचनात आली होती, सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना? ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना? शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा! … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged , | 6 प्रतिक्रिया

कविता….

“तुझं येणं अनोखा थरार पानोपानी फुलणारा ऋतुजात मोहर!!!                            तुझं असणं                            वेड मनाचं                            मनातल्या वेडाचं                            तुझ्यासोबत असणं!!! तुझा ठाव काळजाचा घाव चाहूल बंध बेधुंद श्वास!!!                     तुझा स्पर्श                     हुंकार माझा                     रुणझुणत्या पहाटेचा                     गंधगार गारवा!!!”

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | 2 प्रतिक्रिया