कविता….

“तुझं येणं

अनोखा थरार

पानोपानी फुलणारा

ऋतुजात मोहर!!!

                           तुझं असणं

                           वेड मनाचं

                           मनातल्या वेडाचं

                           तुझ्यासोबत असणं!!!

तुझा ठाव

काळजाचा घाव

चाहूल बंध

बेधुंद श्वास!!!

                    तुझा स्पर्श

                    हुंकार माझा

                    रुणझुणत्या पहाटेचा

                    गंधगार गारवा!!!”

This entry was posted in हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to कविता….

  1. Kedar patankar म्हणतो आहे:

    ही छोटी लेखनकृती चांगली आहे.
    मला ‘कातरवेळ’ वर प्रतिक्रिया द्यायची आहे. प्रत्येक लेखकाने त्याला दिसणा-या प्रतिमा किती निरनिराळ्या प्रकारे व्यक्त केलेल्या असतात!स्वतःचा संबंध भोवतालाशी संध्याकाळीच जुळवावासा वाटतो की काय, नकळे. तुमच्या लेखातले ‘निळेभोर आकाश सांजमेणा होऊन त्याला आपल्या कुशीत घेऊ बघतं.’ ‘कोSहम? कोSहम? कोSहम? चा बेबंद टाहो सारं काही बधीर करून जातो’ या ओळी आवडल्या.
    मला या क्षणी दुर्गा भागवतांचे ‘ऋतुचक्र’ आठवत आहे.

    • shradha kulkarni म्हणतो आहे:

      धन्यवाद केदार,
      माझ्या सहजच खरडलेल्या ओळींवर एवढी सुंदर प्रतिक्रिया बघून खरंच खूप छान वाटतंय….
      आपला स्नेह असाच निरंतर राहो…
      दुर्गाबाई +१

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.