Monthly Archives: एफ वाय

पु.ल.

    आज ०८ नोव्ह., पु.ल. नावाच्या एका मनस्वी कलावंताचा जन्मदिवस. एक ‘आनंदयात्री’ म्हणून पु.ल.देशपांडे हे नाव मराठी माणसाच्या अगदी जवळचं आहे. मराठी माणूस आहे आणि त्याला पु.ल. माहित नाही किंवा त्याने पु.ल. बद्दल ऐकले नाही हा अगदी ‘अशक्ययोग’ असावा.  सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान, आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | १ प्रतिक्रिया

लिटील चाम्पस

  झी मराठीवरील सारेगमपच्या एकूण सगळ्या पर्वांमध्ये “लिटील चाम्पस’  ची लोकप्रियता वादातीत राहिली आहे. एक से एक गुणी मुलं या पर्वात सहभागी झाली होती. झी ने जेव्हा हे पर्व आणलं होतं तेव्हाच हा कार्यक्रम लोकप्रिय होणार याची खात्री होती. आणि यात सहभागी झालेल्या मुलांनी पण यात १००% योगदान दिलं आहे. स्पर्धा संपल्यानंतरसुद्धा हि मुलं ज्या पद्धतीनं आपली कला जतन करताना दिसतात त्यावरून त्यांच्या मेहनतीचं नि त्यांच्या ध्यासाचं कौतुक वाटतं. अन्यथा बऱ्याच वेळा काही जणांची लोकप्रियता त्या त्या वेळापूर्वी मर्यादित राहून जाते. आणि बऱ्याचदा तर अशा कलाकारांच्या नशिबी विस्मृतीत जाण्याचं प्रमाणही जास्त आहे. आजकाल मात्र या बाबतीतला अवेअरनेस वाढला आहे. मिळालेली लोकप्रियता टिकवून ठेवण्याचं तंत्र यांना चांगलच अवगत असते असं वाटतं. किंबहुना यश मिळण्याच्या अगोदरच याचंही प्लानिंग तयार असताना दिसतं. असो, पण त्याच बरोबर आपला प्लस पॉइन्ट हि मुलं विसरलेली नाहीत. ज्याच्या जोरावर आपण प्रसिद्धीच्या झोतात आहोत तो जपण्याकडे, वाढवण्याकडे यांचा असलेला कल बघूनच समाधान वाटतं. सांगण्याचा मुद्दा असा कि काल हि ‘लिटील चाम्पस’ अर्थात ‘कार्तिकी’, ‘आर्या’ आणि इ-टीव्ही वरील गौरव महाराष्ट्राचा विजेता ‘कौस्तुभ गायकवाड’ यांना चिंचवड येथे एका लाइव कार्यक्रमात बघण्याची संधी मिळाली. ‘ऑन स्टेज’ परफॉरमन्स देताना हि मुलं जेवढी निरागस आणि उत्फुल्ल वाटत होती तेवढीच आजही आहेत पण थोडा प्रोफेशनल टच आलाय इतकंच. कार्तिकीला ‘महागायिका’ म्हणून निवडल्यानंतर बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या पण तिच्या आवाजाचं सुरेख मोड्यूलेशन, गाण्यातलं वैविध्य, परफॉर्मन्स बेस्ड गाण्याचं सादरीकरण यावरून तिच डिझरविंग असल्याचं जाणवत होतं. आर्या तर सुरेखच गायली नेहमीप्रमाणे. पण का कोण जाणे प्रचंड थकलेली वाटली. कदाचित कार्यक्रमांची वाढती संख्या अन १२ वी चं वर्ष यात दमून गेली असणार कदाचित. … Continue reading

Posted in सहज सुचलेलं | Tagged | 2 प्रतिक्रिया

कविता

  आपल्या अस्तित्वाचा शोध घेत असलेल्या काही अनामिक क्षणांची गर्दी मनाच्या दरवाज्यावर कसं घेऊ त्यांना आत ? तिथे तर आधीच गर्दी – अर्ध्या-मुर्ध्या जाणिवांची स्वप्नांची चलबिचल अन अस्वस्थ शहारे सुकल्या आसवांचे नकोच त्यापेक्षा…आहे तेच राहू द्यावं नवीन जखमांपेक्षा जुन्या-जाणत्या वेदनांचे चिरपरिचित चेहरे कदाचित सोसणं सोपं करतील… परतवावं त्यांना इथूनच.. नाहीतर मनाआडची हि घालमेल बघून थरारणारं    त्यांचं हिरमुसलेपण नाही बाई सोसवणार…    

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | 4 प्रतिक्रिया

सहज सुचलेलं….

  कधी कधी असंही होतं नं कि आपण एखादी गोष्ट फार अपेक्षेनं करायला जातो आणि येत-जाता तिचा ध्यास लागून राहतो. वरवर पाहता ती गोष्ट फार सहज आणि सोपी वाटून जाते पण प्रत्यक्षात येत येत मात्र त्या गोष्टीने प्रचंड वाट पाहायला … Continue reading

Posted in सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा