लिटील चाम्पस

 

झी मराठीवरील सारेगमपच्या एकूण सगळ्या पर्वांमध्ये “लिटील चाम्पस’  ची लोकप्रियता वादातीत राहिली आहे. एक से एक गुणी मुलं या पर्वात सहभागी झाली होती. झी ने जेव्हा हे पर्व आणलं होतं तेव्हाच हा कार्यक्रम लोकप्रिय होणार याची खात्री होती. आणि यात सहभागी झालेल्या मुलांनी पण यात १००% योगदान दिलं आहे.

स्पर्धा संपल्यानंतरसुद्धा हि मुलं ज्या पद्धतीनं आपली कला जतन करताना दिसतात त्यावरून त्यांच्या मेहनतीचं नि त्यांच्या ध्यासाचं कौतुक वाटतं. अन्यथा बऱ्याच वेळा काही जणांची लोकप्रियता त्या त्या वेळापूर्वी मर्यादित राहून जाते. आणि बऱ्याचदा तर अशा कलाकारांच्या नशिबी विस्मृतीत जाण्याचं प्रमाणही जास्त आहे.

आजकाल मात्र या बाबतीतला अवेअरनेस वाढला आहे. मिळालेली लोकप्रियता टिकवून ठेवण्याचं तंत्र यांना चांगलच अवगत असते असं वाटतं. किंबहुना यश मिळण्याच्या अगोदरच याचंही प्लानिंग तयार असताना दिसतं. असो, पण त्याच बरोबर आपला प्लस पॉइन्ट हि मुलं विसरलेली नाहीत. ज्याच्या जोरावर आपण प्रसिद्धीच्या झोतात आहोत तो जपण्याकडे, वाढवण्याकडे यांचा असलेला कल बघूनच समाधान वाटतं.

सांगण्याचा मुद्दा असा कि काल हि ‘लिटील चाम्पस’ अर्थात ‘कार्तिकी’, ‘आर्या’ आणि इ-टीव्ही वरील गौरव महाराष्ट्राचा विजेता ‘कौस्तुभ गायकवाड’ यांना चिंचवड येथे एका लाइव कार्यक्रमात बघण्याची संधी मिळाली.

‘ऑन स्टेज’ परफॉरमन्स देताना हि मुलं जेवढी निरागस आणि उत्फुल्ल वाटत होती तेवढीच आजही आहेत पण थोडा प्रोफेशनल टच आलाय इतकंच.

कार्तिकीला ‘महागायिका’ म्हणून निवडल्यानंतर बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या पण तिच्या आवाजाचं सुरेख मोड्यूलेशन, गाण्यातलं वैविध्य, परफॉर्मन्स बेस्ड गाण्याचं सादरीकरण यावरून तिच डिझरविंग असल्याचं जाणवत होतं. आर्या तर सुरेखच गायली नेहमीप्रमाणे. पण का कोण जाणे प्रचंड थकलेली वाटली. कदाचित कार्यक्रमांची वाढती संख्या अन १२ वी चं वर्ष यात दमून गेली असणार कदाचित.

‘गौरव महाराष्ट्राचा’ कार्यक्रम विजेता ‘कौस्तुभ’

याला फारसं अनुभवायला नाही मिळालं. काल पहिल्यांदाच लाइव बघितलं याला. छान गातो. सुरांची चांगली जाण आहे. आवाज अजूनही निट ‘फुटलेला’ नसल्यामुळे चिरका वाटला जरा. पण रियाज जाणवतो पोराचा. असो, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. प्रसिद्धीच्या झोतातही त्यांची गुणवत्ता जपली गेली पाहिजे.

पोरं गुणी आहेत फक्त यश नीट हाताळायला जमलं पाहिजे. खरी कसोटी आई-बाबांची. एक उत्तम कार्यक्रमाची मेजवानी या विकांताला मिळाल्यामुळे पुढचा आठवडा चांगला जाणार हे नक्की. 

हे काही पिक्स….

 

 

 

Advertisements
This entry was posted in सहज सुचलेलं and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to लिटील चाम्पस

  1. Vivek kulkarni म्हणतो आहे:

    Awesome…..

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s