Monthly Archives: एफ वाय

बुरखा​

  काल सहजच मनात विचार आला हट्टाने पांघरलेल्या समजूतदारपणाचा बुरखा जरा चाचपायला हवा, बऱ्याच दिवसांत हात फिरवला नाहीये  त्याच्या वीणेवरून…    घुसमटणाऱ्या आठवणींच्या हिसक्यांनी  जरा कातर झालीये शिवण… ठाऊक आहे मला, माझ्या डोळ्यांनाही न जाणवलेले अनेक थेंब अलगद टिपलेत यांनी….  ती ओलसर ऊब जरा उन्हात टाकायला हवी.    कितीतरी काचणारे हळवे आघात पोहोचूच दिले नाहीयेत माझ्यापर्यंत मनाची तालमता आहे जरा टिकून पण ‘बुरखा’ मात्र जीर्ण होतोय….   माझ्या ‘वस्त्रांकित’ जाणिवांचा देह कधी थरारतो अधे – मधे तेव्हा हा ‘बुरखाच’ तर असतो घट्ट लपेटणारा मला.   सारेच आडोसे, हवेसे अन नकोसेही स्वतःच्या तलम धाग्यांत गुंफून घेतो ‘हवेसेच देताना’ अन ‘नकोसेही जपताना’ तटस्थ शहाणपण राखतोही नकळत.  … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged , | यावर आपले मत नोंदवा