Category Archives: हिंदोळे मनाचे

राधा

सावळ्याचं निळं गोंदण  राधा वागवत राहिली आपल्या तन – मनावर एक असीम ओढीनं तिनं जपले  प्रेम आणि विरहाच्या झुल्यावरचे अबोल क्षण सावळा कर्म आणि धर्माची वेस हाती गच्च पकडून चालत राहिला एका आदिम-अविनाशी भविष्याकडे… राधेनं मात्र सांभाळला रितीभातींचा जनमान्य हुंकार प्रवाहात राहूनही प्रवाहाविरुद्ध … Continue reading

Posted in असेच काही…, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

आताशा,   पाऊस अजूनही पडतो, माती अजूनही हुळहुळते, धुमारे फुटतात, सृजनाची ओढ अजूनही आपलं अस्तित्व  राखून आहे…    पण….   ‘पावसाशी हितगुज मांडणारी ती ओळख कुठेतरी हरवून बसलीये….’   आताशा,   रस्ते तेच आहेत, चालतं होण्याची सारी प्रलोभनं जशीच्या तशीच आहेत आपापल्या जागी, एखादी वळणवेडी पाऊलवाट ओळखीचं स्मित … Continue reading

Posted in असेच काही…, कविता, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

सय…

बिलगून  येता तुझ्या आठवणींचे धुमारे अवघ्या अस्तित्वाची सतार बनते मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली, हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . . स्वप्नांचे  ओघळ, स्पर्शांचे पिसारे अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

​​​

खूप  दिवसांनी इकडे फिरकलेय … मनात उगाचच एक हुरहूर आहे… खूप दिवसांनी भेटलेल्या सखीला सामोरं जाताना येणारं एक अनामिक अस्वस्थपणा जाणवतोय … आदिम जवळीक आहेच तरीही अंतराने आलेला हळवा दुरावा ही आहेच …. अवघडलेलं तिऱ्हाईत पण सरलं की  ओळखीच्या खुणा … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

मराठी दिना निमित्त कवी कुसुमाग्रजांची माझी अत्यंत आवडती कविता पोस्ट करतेय…… टेकडीच्या माथ्यावर चिरेबंदी एक घर पाही वाट अज्ञाताची, कोण जाणे कोठवर बंगल्याच्या आवारात पिंपळाच्या वृक्षाखाली एका खुर्चीमध्ये स्तब्ध कुण्या कविची सावली… निस्तब्धाच्या काठावर उभे सारे चराचर मौनरागी धूसरात रातकीटकांचे … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा

बुरखा​

  काल सहजच मनात विचार आला हट्टाने पांघरलेल्या समजूतदारपणाचा बुरखा जरा चाचपायला हवा, बऱ्याच दिवसांत हात फिरवला नाहीये  त्याच्या वीणेवरून…    घुसमटणाऱ्या आठवणींच्या हिसक्यांनी  जरा कातर झालीये शिवण… ठाऊक आहे मला, माझ्या डोळ्यांनाही न जाणवलेले अनेक थेंब अलगद टिपलेत यांनी….  ती ओलसर ऊब जरा उन्हात टाकायला हवी.    कितीतरी काचणारे हळवे आघात पोहोचूच दिले नाहीयेत माझ्यापर्यंत मनाची तालमता आहे जरा टिकून पण ‘बुरखा’ मात्र जीर्ण होतोय….   माझ्या ‘वस्त्रांकित’ जाणिवांचा देह कधी थरारतो अधे – मधे तेव्हा हा ‘बुरखाच’ तर असतो घट्ट लपेटणारा मला.   सारेच आडोसे, हवेसे अन नकोसेही स्वतःच्या तलम धाग्यांत गुंफून घेतो ‘हवेसेच देताना’ अन ‘नकोसेही जपताना’ तटस्थ शहाणपण राखतोही नकळत.  … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

अव्यक्त काही….

    “अव्यक्त काही उरी दाटते शब्दांचेही होत धुके मौन डोळ्यांत बुडू लागता अर्थांनाही जाग येते   नकोच आता खुळे बहाणे नकोच ते वळून पाहणे नकोच घालुयात शपथा वेड्या नको चाचपडूया परतीच्या वाटा   असुदे असेच शब्दांचे ओझे नको मोजूया … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , | १ प्रतिक्रिया