Category Archives: कविता

आताशा,   पाऊस अजूनही पडतो, माती अजूनही हुळहुळते, धुमारे फुटतात, सृजनाची ओढ अजूनही आपलं अस्तित्व  राखून आहे…    पण….   ‘पावसाशी हितगुज मांडणारी ती ओळख कुठेतरी हरवून बसलीये….’   आताशा,   रस्ते तेच आहेत, चालतं होण्याची सारी प्रलोभनं जशीच्या तशीच आहेत आपापल्या जागी, एखादी वळणवेडी पाऊलवाट ओळखीचं स्मित … Continue reading

Posted in असेच काही…, कविता, सहज सुचलेलं, हिंदोळे मनाचे | १ प्रतिक्रिया

सय…

बिलगून  येता तुझ्या आठवणींचे धुमारे अवघ्या अस्तित्वाची सतार बनते मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली, हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . . स्वप्नांचे  ओघळ, स्पर्शांचे पिसारे अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

मराठी दिना निमित्त कवी कुसुमाग्रजांची माझी अत्यंत आवडती कविता पोस्ट करतेय…… टेकडीच्या माथ्यावर चिरेबंदी एक घर पाही वाट अज्ञाताची, कोण जाणे कोठवर बंगल्याच्या आवारात पिंपळाच्या वृक्षाखाली एका खुर्चीमध्ये स्तब्ध कुण्या कविची सावली… निस्तब्धाच्या काठावर उभे सारे चराचर मौनरागी धूसरात रातकीटकांचे … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | यावर आपले मत नोंदवा