Tag Archives: कविता

सय…

बिलगून  येता तुझ्या आठवणींचे धुमारे अवघ्या अस्तित्वाची सतार बनते मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली, हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . . स्वप्नांचे  ओघळ, स्पर्शांचे पिसारे अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

बुरखा​

  काल सहजच मनात विचार आला हट्टाने पांघरलेल्या समजूतदारपणाचा बुरखा जरा चाचपायला हवा, बऱ्याच दिवसांत हात फिरवला नाहीये  त्याच्या वीणेवरून…    घुसमटणाऱ्या आठवणींच्या हिसक्यांनी  जरा कातर झालीये शिवण… ठाऊक आहे मला, माझ्या डोळ्यांनाही न जाणवलेले अनेक थेंब अलगद टिपलेत यांनी….  ती ओलसर ऊब जरा उन्हात टाकायला हवी.    कितीतरी काचणारे हळवे आघात पोहोचूच दिले नाहीयेत माझ्यापर्यंत मनाची तालमता आहे जरा टिकून पण ‘बुरखा’ मात्र जीर्ण होतोय….   माझ्या ‘वस्त्रांकित’ जाणिवांचा देह कधी थरारतो अधे – मधे तेव्हा हा ‘बुरखाच’ तर असतो घट्ट लपेटणारा मला.   सारेच आडोसे, हवेसे अन नकोसेही स्वतःच्या तलम धाग्यांत गुंफून घेतो ‘हवेसेच देताना’ अन ‘नकोसेही जपताना’ तटस्थ शहाणपण राखतोही नकळत.  … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

अव्यक्त काही….

    “अव्यक्त काही उरी दाटते शब्दांचेही होत धुके मौन डोळ्यांत बुडू लागता अर्थांनाही जाग येते   नकोच आता खुळे बहाणे नकोच ते वळून पाहणे नकोच घालुयात शपथा वेड्या नको चाचपडूया परतीच्या वाटा   असुदे असेच शब्दांचे ओझे नको मोजूया … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , | १ प्रतिक्रिया

पाऊसगाणी

        नभ भरून आले ऋतू बेधुंद झाला वाऱ्याची बेगुमान साद आता ये ना जराशी ​ पाचोळ्यानी धरला फेर झाडे झिम्मा गं खेळती चाले ढगांचा लपंडाव आता ये ना जराशी   तहानल्या धरतीवर जलधारा गं बरसती झिम्माड ओली … Continue reading

Posted in कविता | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

कविता

“रात्रीच्या गूढ गर्भात विरत जाणाऱ्या चाहुलींच्या गर्द वाटा…. अस्पष्ट लयीत घुमत जाणारा श्वासांचा हिंदोळा ….   देहभर उमटत जातात स्पर्शांचे कवडसे लखाकून उठतो गात्रांत थिजलेला अस्फुट पारा खिडकीशी चंद्र घुटमळतो थोडा रातराणीही वाटते थोडीशी हळवी….   आत आत खोलवर डुचमळत … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

प्राजक्त….

दारी उभा प्राजक्त जडे सुवासाचे वेड बहर चांदण्यातला करी सुखाची शिंपण !!!   दारी उभा प्राजक्त जणू जिवाचा जिव्हाळा सख्या साजणाची सय मन पाखरू वेल्हाळ !!!    दारी उभा प्राजक्त श्वास गुंतला मारवा मंद मंद सुवास धुंद जगण्याचा सूर !!! … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

तू – मी

तू – मी   तू तिथे, मी इथे, वेगवेगळ्या ग्रह गोलांवर वसती करून आहोत आपण मनात दाटलेले शंकांचे मळभ अजूनच धुसर करतायत वाटा आपल्या मधल्या…   तुझ्या-माझ्यातील एकेक कडी निखळताना सुटणारे निःशब्द हुंकार पोहचत असतील का रे तुझ्यापर्यंत? का तू … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा