Tag Archives: हिंदोळे मनाचे

सय…

बिलगून  येता तुझ्या आठवणींचे धुमारे अवघ्या अस्तित्वाची सतार बनते मी गुंफत जाते तुझ्या असण्याचे भास माझ्या भोवताली, हलकीच जाग येते मग दाटल्या निजेला . . . . स्वप्नांचे  ओघळ, स्पर्शांचे पिसारे अकल्पिताचे काहूर उरी दाटलेले मी शोधीत जाते स्मरणांचे किनारे … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

बुरखा​

  काल सहजच मनात विचार आला हट्टाने पांघरलेल्या समजूतदारपणाचा बुरखा जरा चाचपायला हवा, बऱ्याच दिवसांत हात फिरवला नाहीये  त्याच्या वीणेवरून…    घुसमटणाऱ्या आठवणींच्या हिसक्यांनी  जरा कातर झालीये शिवण… ठाऊक आहे मला, माझ्या डोळ्यांनाही न जाणवलेले अनेक थेंब अलगद टिपलेत यांनी….  ती ओलसर ऊब जरा उन्हात टाकायला हवी.    कितीतरी काचणारे हळवे आघात पोहोचूच दिले नाहीयेत माझ्यापर्यंत मनाची तालमता आहे जरा टिकून पण ‘बुरखा’ मात्र जीर्ण होतोय….   माझ्या ‘वस्त्रांकित’ जाणिवांचा देह कधी थरारतो अधे – मधे तेव्हा हा ‘बुरखाच’ तर असतो घट्ट लपेटणारा मला.   सारेच आडोसे, हवेसे अन नकोसेही स्वतःच्या तलम धाग्यांत गुंफून घेतो ‘हवेसेच देताना’ अन ‘नकोसेही जपताना’ तटस्थ शहाणपण राखतोही नकळत.  … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

प्रिय श्रावी,

हा तुझ्या सुट्टीचा शेवटचा आठवडा. पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होईल. मग तुला तुझंही एक रुटीन सापडेल आणि तू त्यात रमूनही जाशील. खूप दिवसांनी तुला पत्र लिहितेय. आज मी तुझ्याशी जे बोलणार आहे नं ते मी तुला समोर सांगून समजणारच नाहीये … Continue reading

Posted in पत्रं - एक संवाद, श्रावीला लिहिलेली पत्रे, हिंदोळे मनाचे | Tagged | 2 प्रतिक्रिया

Happy Birthday…. :)

जगण्याच्या प्रवासातला हरेक क्षण कधी आठवण बनून तर कधी अनुभव बनून राहतात. कधी या रम्य क्षणांचं कोलाज आयुष्य रंगीबेरंगी करतात तर कधी हातात हात घालून आयुष्याची चढण सुसह्य करतात. आता जगलेला क्षण पुढच्या क्षणी आठवण बनून उरतो. अशाच अनेक क्षणांना … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

जागतिक महिला दिन

नेहेमीप्रमाणेच या वर्षीचा मार्च उगवताना जागतिक महिला दिनाचं बिगुल वाजू लागलं आणि नेहेमीच्याच परंपरेप्रमाणे चार-दोन भाषणं, एक दोन नवीन विधेयकांची खिरापत आणि अशीच चार दोन फुटकळ आश्वासनं यांचा उहापोह झाला. खुद्द महिला ही या दिवसाला आणखी एका सेलिब्रेशन चा योग … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

शिशीर ऋतूच्या पुनरागमे…..

  रात्री प्रदीर्घ झाल्या की हिवाळ्याची चाहूल लागते. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसात सुस्नात होऊन गेलेली सृष्टी धुक्याची झिरझिरीत चुनरी पेहरून सज्ज होते. सुरंगी गाताना लोभवणारे राघववेळेचे प्रहर जागे होऊ लागले व गंधगाररात्रीच्या लांब कृष्णसावल्या सरपटू लागल्या की शिशीर आगमनाची ग्वाही मिळते. हवेतला गारठा आणि हाडांपर्यंत पोहोचणारे थंड गार वारे आपलं अस्तित्व हलके हलके जाणवू लागतात. कापसागत भुरभुरणारं दंव इथे-तिथे सांडत साऱ्या वाटा धुक्यात बुडू लागल्या की शब्दांचंही धुकं होतं आणि मनातलं गाणं मुकं होतं. मग सुरु होतो आपलाच आपल्याशी संवाद. एरवीच्या दैनंदिन जीवनात ऋतूने बदललेली कूस कशी उमजावी? दूर मंदिरात होणारा घंटारव, काकडारतीचा गजर, सावळ्या विठ्ठलाची शुचिर्भूत होउन भक्तांच्या मेळाव्यात स्थानापन्न होण्याची लगबग, आळसावलेल्या सूर्याचे लाडिक आळोखे-पिळोखे, … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

The Road Not Taken

  The Road Not Taken Two roads diverged in a yellow wood, And sorry I could not travel both And be one traveler, long I stood And looked down one as far as I could To where it bent in … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा